पोस्ट्स

हिंदुत्व ,पुरोगामीत्व,देव यावर कांही मुद्दे विचारार्थ लिहितो. -राजीव लिपारे 1)हिंदुधर्म म्हणजे मनुवाद नव्हे, समजुतीमधील अशा गफलतींमुळेच पुरोगामी विचारसरणीत विकृती आलेली आहे व त्यांचा जनाधार लयास गेलेला आहे. पुरोगामी विचारसरणीचे लोक धर्म निरपेक्ष भूमिका सोडून जसजसे मुस्लिम व ख्रिश्चन अनुनयाची भूमिका घेऊ लागले तसतसा त्यांचा जनाधार ओसरत गेलेला आहे. अशा भूमिकांमुळेच बहुसंख्य समंजस हिंदू bjp कडे नाईलाजाने ढकलले गेले. 2)घटना समितीमधील 90% सदस्य हिंदू धर्म मानणारेच होते.हिंदुधर्म म्हणजे मनुवाद असता तर अशी धर्म निरपेक्ष व प्रत्येकाला प्रगतीची संधी देणारी घटना लिहिली गेली नसती. 3)मी जितके आंबेडकर वाचलेले आहेत त्यात मला त्यांची समंजस व विचारी भूमिकाच दिसलेली आहे, कोठेही द्वेष नाही. माझ्या विचारांचा विवेकानेच मागोवा घ्या, आंधळेपणाने शब्दप्रामाण्य मानू नका असे ते सांगतात. मात्र त्यांचे कांही अनुयायी त्यांच्या आडोशाने कडव्या माओ वादाकडे झुकलेले दिसतात हे दुर्दैव! 4) बाबासाहेबांसह सर्वच महापुरुष हे आपापल्या काळाच्या चौकटीत बंदिस्त असतात. त्यांचे शब्द व प्रासंगिक भूमिका या त्या त्या स्थळ, काळ व ...
कर्नाटक घटनेवरून सुचलेले विचार आता खालीलप्रमाणे घटनादुरुस्ती हिने गरजेचे आहे १) राज्यपाल / राष्ट्रपती यांचा सत्सदविवेकाचा अधिकार काढून घ्यावा. तसेच या बाबतीत निश्चित  अशी नियमावली तयार करून तशी घटना दुरुस्ती करावी. २) बहुमत सिद्ध करण्यासाठीही निश्चित कालावधी असावा.

भूमिका

भूमिका  नमस्कार!,            आजपासून हा नवीन ब्लॉग चालू करतोय.. व्हाट्स अप व अन्य सोशल मीडियावरून भूमिका मांडताना खूपच मर्यादा येतात. म्हणून हा ब्लॉग.यावर अगदी मनमोकळेपणाने कुणाहीबद्दल कोणताही पूर्वग्रह न ठेवता मला जे वाटतं ते मांडणार आहे. यावरील चिकित्सक टीकेचे स्वागतच आहे. अशी टीका अधिक प्रगल्भ होण्यास उपयुक्त ठरते असे मला वाटते.